"शं नो वरुणः"
म्हणजेच "पाण्याचा स्वामी आम्हाला शुभेच्छा देतो."
वरील सुंदर वाक्य आपल्या "भारतीय नौदलाचे आहे".चला तर जाणून घेऊया भारतीय नौदला बद्दल.
भारताचे नौदल प्रमुख -सुनील लांबा असून ते नौदलाचे २३ वे प्रमुख आहेत भारताकडे विक्रमादित्य ,विराट या बलाढ्य विमानवाहु नौका आहेत. भारतीय नौदल जगातील ७ व्या क्रमांकाचे नौदल आहे जगातील १० शक्तिशाली राष्ट्र (नौदलात) पुढील प्रमाणे:१.अमेरिका २.रशिया ३.चीन ४.जापान ५ .ब्रिटेन ६.फ्रांस ७.भारत ८.द. कोरिया ९.इटली १०.तैवान या देशांचा समावेश होतो.
भारतीय नौदलाची रचना
भारत हा द्वीपकल्प असलेला देश आहे ;म्हणजेच भारताच्या तिनहि बाजूने पाण्याचा वेढा आहे ,पूर्वेला बंगलचा उपसागर ,पश्चिमेला अरबी समुद्र अणि दक्षिणेला हिंद महासागर अशी भूरचना असलेल्या देशात सागरी मार्गाने परकीय आक्रमणाची भीति असते;परंतु भारतीय नौदल आपल्या शौर्यने ती जबाबदारी पर पाडते. नौदलात -
नौदलप्रमुख (THE CHIEF OF THE NAVAL STAFF)प्रमुखांना मदतीसाठी सह. नौदल प्रमुख (VICE CHIEF OF THE NAVAL STAFF)असतात. उप नौदल प्रमुख (DEPUTY CHIEF OF THE NAVAL STAFF)
कर्मचारी प्रमुख (THE CHIEF OF PERSONNEL)
नौदलप्रमुख (THE CHIEF OF THE NAVAL STAFF)प्रमुखांना मदतीसाठी सह. नौदल प्रमुख (VICE CHIEF OF THE NAVAL STAFF)असतात. उप नौदल प्रमुख (DEPUTY CHIEF OF THE NAVAL STAFF)
कर्मचारी प्रमुख (THE CHIEF OF PERSONNEL)
सामग्री प्रमुख (THE CHIEF OF MATERIAL)
वरील प्रमाणे नौदलाचे प्रशासन काम करते
नौदलाचे प्रशासकीय विभाग
- पश्चिम नौदल सेना :-या विभागाचे कार्यक्षेत्र अरबी समुद्रातील हालचालीवार नियंत्रण ठेवणे आहे याचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे.
- पूर्वी नौदल सेना :-या विभागाचे कार्यक्षेत्र बंगालचा उपसागर या मधील हालचालीवार नियंत्रण ठेवणे आहे याचे मुख्यालय विशाखापट्टणम या ठिकाणी आहे.
नौदलाचे मुंबई,विशाखापट्टणम या ठिकाणी आरमारी तांडा आहे.तसेच पोर्टब्लेअर या ठिकाणी कमी जहाजांचा आरमारी तांडा आहे.
अंदमान -नोकोबार या बेटाच्या संरक्षणाची जबाबदारी तीनही सैन्य दलाला आहे.तीनही सैन्याचा समन्वय पोर्टब्लेअर येथील अंदमान निकोबार विभागाच्या मुख्यालयात होतो.हे एकमेव असे विभाग आहे ज्याचे कमांड इन चीफ असतात,त्याची नियुक्ती तीनही सैन्य दलातून होते.
भारतीय नौदल हे खूप शक्तीशाली सैन्यदल आहे,
नौदलातील शक्तीशाली शस्त्रे (निवडक)
पाणबुड्या- सिंधुराष्ट्र, सिंधुराज, सिंधुविर, सिंधुकेसरी सिंधुविजय,सिंधुरक्षक,सिंधुध्वज,सिंधुराज,सिंधरत्न,सिंधुकीर्ती,शलकी,शंकुश, शिशुमार अनु-इंधन-अरिहांत,
भारतीयनौदलची कार्यक्षमता अफाट असून भविष्यात आपले नौदल खूप प्रगती करेल, त्यांच्या कार्याला मनापासून अभिवादन.जय हिंद
No comments:
Post a Comment